Wednesday, December 11, 2024

आजचा दिवस माझा

 आजचा दिवस माझा .....


हे पुस्तक वाचतांना 


आपण भारावून जातो.आणि आपण ही स्पर्धा परीक्षेची तयार करावी असे मनोमन वाटुन जाते. एक शिक्षक ते जिल्हाधिकारी असा संघर्षमय प्रवास श्री.विजय कुलांगे (IAS) सर यांचा झाला. अगदी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन हलाखीची परिस्थिती असतांना केवळ जिद्द  व चिकाटीच्या बळावर मोठे  यश मिळवून समाजात आदर्श निर्माण करणारे पूर्वाश्रमीचे शिक्षक असलेले कुलांगे सर यांचे आत्मकथन आपण सर्वांनी नक्की वाचावे .यातून नक्कीच नवी उर्जा आपल्याला मिळेल. आणि नवनिर्मिती घडविण्यास प्रेरणा मिळेल.... 

सरांचे यश इतरांना नक्कीच प्रेरणादायी आहे.... ....

गोरख जाधव गंगाधरी 

Sunday, December 15, 2019

वृक्षारोपणाची तयारी ....

पुढील एक ते दोन वर्षात  वृक्षारोपण करायचे असेल तर आजच तयारीला लागा.आजच रोपं आणा. यारोपांची व्यवस्थित काळजी घ्या. उन्हाळ्यात यारोपांना सावलीत ठेवा......कारण आपण जर छोट्या रोपांची लागवड केली तर छोट्या रोपांची जास्त काळजी घ्यावी लागते.काही वेळेस पाणी कमी मिळले  किंवा वातावरणातील बदलाला ही रोपं बळी पडतात.मोठे रोपं असेल तर कमी पाण्यावरही तग धरून राहतात. मग आजच पुढील तयारीला लागा....मागील काही वर्षांपासुन आम्ही  हा उपक्रम छोट्या प्रमाणात राबवित आहोत......मागील वर्षी नेटची सावली करुन रोपांचे रक्षण केले व पावसाळ्यात अनेकांना हे रोपं वाटले.....

आमचे मित्र श्री. दिपक घोडेराव यांनी यावर्षी हा उपक्रम सुरू करण्याचा विचार मांडला आहे..... 

Tuesday, December 3, 2019

संकल्प निसर्ग संवर्धनाचा.....

झाडे जगवा अभियान....


🌱🌱🌳🌱🌱
निसर्ग संवर्धनाचा करु संकल्प..
 झाडे जगवा अभियानात सहभागी होऊन आपल्या परिसरातील झाडांच्या बुडाशी गवत , झाडांचा पालापाचोळा , गोणी , बारदान , माती ,दगड आदींची भर लावुन निसर्ग संवर्धनासाठी एक पाऊल पुढे येऊया.
🌳🌳झाडे जगवु या...🍀🍀
तसेच  झाडांना  चुना ,हिरमुंजी लावायला पाहिजे.त्यामुळे झाडांना उदई लागत नाही.
 व झाडे फार सुंदर दिसतात व परिसर ही सुंदर दिसतो.

🌱🌱🙏🌱🌱
गोरख जाधव
 गंगाधरी
 ता. नांदगाव जि.नाशिक