रोप लागवड तंत्र

आपण कोणत्या जमिनीत झाड लावत आहोत  त्या नुसार रोप लागवडी साठी खड्डे खोदणे आवश्यक आहे.
खड्डे शक्यतो उन्हाळ्यात खोदणे योग्य असते. जमीन काळी कसदार असेल तर एक ते दीड फुट खोल खड्डे खोदावे . जमीन मुरमाड , डोंगराळ असेल तर झाडाच्या वाढी साठी किमान अडीच ते तीन  फुट खोल खड्डा खोदुण पंच्याहत्तर टक्के खड्डा काळ्या मातीने भरून घ्यावा . 
रोप किमान चार ते पाच फुट उंच असावे. रोपाच्या संवर्धनासाठी ट्री गार्ड (जाळी) असावी. पावसाळ्यात पाणी टाकू नये. रोपं जर उंच असेल तर डिसेंबर ते जानेवारी महिन्यात पाणी टाकणे सुरू करावे.

शक्यतो झाडं पंधरा ऑगस्ट च्या अगोदरच लावावे.
रस्ता वाढीचा विचार करुनच वृक्षारोपण करावे . रस्त्यापासून लांब अंतरावर वृक्षारोपण करावे.

No comments:

Post a Comment